बेळगाव दि १९ :विद्यार्थ्यानी दहावीच्या परीक्षेला सामोरे कसे जावे, व दहावीनंतर करीअर कशात करावे यासाठी जायंटस मेन, नेताजी युवा संघटना, द युनिक ज्योती अकॅदमी शाखा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. अध्यक्षास्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र गिंडे होते. व्यासपीठावर उदघाटक महापौर सरीता पाटील, प्रमुख पाहुणे सुनील चौगुले (बिल्डर आणि डेव्हलपर) , अनिल चौगुले (होलसेल फ्रुट मार्केट) उमेश पाटील (अध्यक्ष जायंटस मेन) , महादेव पाटील (सेक्रेटरी जायंटस मेन) होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नेताजी मराठी सांस्कृतिक भवन येळ्ळूर येथे केले होते,
कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थीनींच्या ईशस्तवनाने झाली.
उदघाटक महापौर सरीता पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो पुजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.
प्रास्तविक सी एम गोरल यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांची ओळख डी जी पाटील यांनी करून दिली. तर प्रा. राजकुमार पाटील यांची ओळख व या मार्गदर्शन शिबिराचा उद्देश जायंटस मेन चे मा.अध्यक्ष मदन बामणे यांनी सांगितला.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रा राजकुमार पाटील म्हणाले की करीअर कशाला म्हणतात? यासाठी अनेक उदाहरणे देवून त्यांनी विद्यार्थ्यानी दहावीच्या परीक्षेला सामोरे कसे जायचे ते सांगितले.
दहावी नंतर काय? यावर बोलताना म्हणाले, अनेक पालकांच्या डोक्यात माझ्या मुलाने सायन्सच घेतले पाहिजे, नाहीतर काॅमर्सच घेतले पाहिजे, अशी भुमिका घेतात हेच मुळी चुकीचे आहे, आर्टस घेऊन CA बनता येते, त्यासाठी काॅमर्सच घ्यायची गरच नाही असे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले.
फक्त मन लावून आभ्यास करा, रोज वर्तमान पत्रे वाचा, घरातील सर्वानी मिळून टि व्ही वरच्या बातम्या ऐका आसा सल्ला दिला. त्यामुळे तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल.
इंजिनियर, डाॅक्टर, बनण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा देऊन आपलं करीअर घडवा असे सांगितले.
तत्पूर्वी महापौर सरीता पाटील यांनी दहावी नंतरची दोन वर्षे फार महत्त्वाची असतात असे सांगितले, कारण दहावीपर्यंत कसेतरी येऊन पोहोचतो ,त्यानंतर माध्यमिक शाळा सोडून महाविध्यालयात प्रवेश घेतला जातो, इथे एकदम भाषा बदलते व हीच दोन वर्षे कसोटीची ठरतात.
यासाठी तुम्ही मन लावून अभ्यास करा असे सांगितले.
प्रमुख पाहुणे सुनील चौगुले यांनी सांगितले की समाजातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने दरवर्षी पाच विद्यार्थ्याना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार महादेव पाटील यांनी केले .
यावेळी विद्यार्थी ,पालक व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते,
जायंटसचे अध्यक्ष उमेश पाटील, मदन बामणे, अरूण काळे, सुनील भोसले, सुनील मुतगेकर, लक्ष्मण शिंदे, विजय पाटील, सतीश कुगजी, रमेश धामणेकर, कानशिडे उपस्थित होते.