बेळगाव दि १२ : क्रांती मोर्चात खानापूर रोड वरून येणाऱ्या सर्व लोकासाठी बेळगावातील कारखानदारांनी अल्पोहाराची सोय करण्यार असल्याची घोषणा केला नंतर मुस्लिम बांधवांनी मराठा क्रांती मोर्चात पाणी वितरण आणि शरबत वाटपाची व्यवस्था हाती घेतली. या पाठोपाठ पूर्व भागातील नागरिकांनी १० हजार पुलाव पाकिटांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
खास स्वयंपाकी लावून जास्तीत जास्त शाकाहारी पुलावाची निर्मिती केली जाणार असून मोर्चात सहभागी होणाऱ्यांना तो वितरित केला जाणार आहे.
मोर्चाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता होईल, दरम्यान शहराबाहेर पार्किंग करून यावे लागणार असल्याने बहुतेक नागरिकांना सकाळी ७ वाजताच बाहेर पडावे लागेल. त्यांच्या पोट पाण्याची आबाळ होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.