बेळगाव दि १५ :मोर्चात सहभागी होणाऱ्या डॉक्टर्स विशेष टीम आणि संयोजकांनी तयार केलेली मार्ग दर्शक सूची
1) मोर्चात येताना शिदोरी व पाण्याची बाटली घेऊन येणे.
2) मूक मोर्चा असल्याने कोणतीही घोषणा देऊ नये, जोरात बोलू नये.
3) मोर्चात सहभागी होणाऱ्यानी पान, गुटखा, तंबाखू, धुम्रपान व दारू पिऊन किंवा कोणतेही व्यसन करून येऊ नये.
4) कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये.
5) स्वयंसेवक (मावळे) व वैद्यकीय मदतनीस यांना सहकार्य करावे.
6) मोर्चाची सांगता झाल्यावर आपण शांतपणे घरी परत जायचे आहे, जाताना कोणतीही घोषणाबाजी करू नये.
7) दहा वर्षाच्या आतील मुलांना मोर्चात आणू नये.
8) गर्भवती स्त्रीयांनी मोर्चात सहभागी होऊ नये.
9) बरोबर येताना तुमची रोजची औषधे घ्यावीत.
10) मोर्चा उन्हात असल्याने भरपूर पाणी पिणे.
11) बीपी , मधुमेह, हार्ट रूग्णांनी आपली औषधांची चिठ्ठी सोबत ठेवावी म्हणजे जरूर पडल्यास डॉक्टरांना ही माहिती फार उपयोगी पडते.
12) ह्रदयविकाराचे रूग्ण असल्यास मोर्चात जास्त वेळ चालू नये, एखाद्या ठिकाणी उभा राहून सहभाग दर्शवू शकता.
13)छातीत दुखल्यास अगर जास्त घाम आल्यास त्वरित स्वयंसेवकाशी (मावळा) संपर्क करणे.
14) मोर्चा चालू असताना एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडल्यास मोर्चातील नागरीकांनी त्याच्याजवळ गर्दी करू नये, स्वयंसेवकाशी संपर्क करावा.
15) फिट येत असल्यास सोबत ओळखीच्या व्यक्तीला घेऊन येणे, जर औषध गोळ्या चालू असतील तर बरोबर घेणे,
16) प्रत्येकांनी येताना आपली ओळख पत्राची झेरॉक्स प्रत बरोबर घेणे.
Trending Now