अनगोळ,भाग्यनगर,वडगाव, के एल ई चे दुषित पाणी येळ्ळूर रस्त्यालगत पासून सुरू होणार्या बळ्ळारी नाल्यात सोडल्याने शेतकरी बंधूनी तक्रार केली होती कि या सांडपाण्याने परिसरातील पिकाऊ सुपीक जमीनीतील पिके तसेच प्रकुर्तिला हानीकारक आहे.तेंव्हा हे येणारे पाणी थांबवून परस्पर पर्याय सुचवावा म्हणून आपण मागे आदेश दिला होता.पण आता मनपा वरिष्ठ अधिकारी आपल्या आदेशाला तिलांजली देत परत तेच पाणी शेतकर्यांना विश्वासात किंवा अनुमती न घेता पिकाऊ जमिनीतून मोठे पाईप घालून सांडपाणी बळ्ळारी नाल्यात सोडण्यासाठी जेसिबीने पिक असतानां चरी मारण्याचे काम सुरु होते ते शेतकरी व शेती बचाव समितीने अडवले.तिथून आधिची ड्रेनेज लाईन गेले ती काढून मोठ्या पाईप घालून सांडपाणी न्या आणि या परिसरातील सुपीक जमीन वाचवा असे सांगितले पण अधिकारी व परिसरातील लोकप्रतिनिधीनी हे बेकायदेशीर काम थांबवावेत म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश द्यावेत अन्यथा आपण दिलेल्या सांडपाणी प्रकरणी आदेशाला तिलांजली दिल्यासारखे होईल आणि शेतकर्यांच्या सुपीक जमीनी आणि प्रकुर्तिची आपल्याला अजिबात काळजी नाही असेच म्हणावे लागेल.
Trending Now
Less than 1 min.
Previous article