चंदगड दि २५ : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत चंद्गडी मतदारांनी दिग्गजांच्या वारसांना नाकारलं आहे .चंदगडच राजकारण हे आजपर्यंत तिन्ही पाटलांभोवती फिरत राहिल. त्याला चंदगडी जनतेनं त्यांना आजवर केवळ खांद्यावर नव्हे तर डोक्यावर घेतल. प्रसंगी आपल्या नेत्यासाठी पदरचे पैसे खर्ची घातले. त्याबदल्यात नेते त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर “हात” फिरवायचे आणि यातच हे कार्यकर्ते स्वतःला मोठ समजायचे.
पण काळ माग सरला आणि लोकांच्यात समज येऊ लागली. हळूहळू जनतेला आपला नेता म्हणजे केवळ दिवास्वप्न दाखवतो याची जाणीव होऊ लागली.. पुढे पुढे त्यांना आपल्या नेत्यांच्यासाठी स्वतःच डोक फोडून घेण्यात आणि त्यांच्या राजकारणासाठी आपली हयात घालवण्यात कुठला पराक्रम नाही हे समजायला लागल.
एक काळ होता की कार्यकर्ते उपाशी तपाशी नेत्यांचा “जय” घालायचे . मात्र , पुढ हे नेते लठ्ठ पैसे कमवुन आपल्याच घरात सगळी पद ठेवू लागले. इथेच जनतेला आपला नेता आपला फक्त “नॅपकीन पेपर” सारखा वापर करतोय हे समजायला सुरूवात झाली . मात्र , नेत्याविषयीची निष्ठा त्यांच्या मनातून कमी व्हायला तयार नव्हती . त्याला जवळपास चार दशके जावी लागली आणि संथ गतीच्या परिवर्तनाने 2017 च्या निवडणुकीत तिन्ही नेत्यांच्या वारसांना (माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांची सुन सौ. ज्योती पाटील, माजी आमदार कै. नरसिँगराव पाटील याचा पुत्र महेश पाटील, दौलतचे माजी चेअरमन गोपाळ पाटील यांचे पुत्र विशाल पाटील ) मतदारांनी झिडकारले आणि इतिहास घडवला. मोठ्या मतांच्या फरकानी वारसांचा पराजय झाल्यान
नेत्यांना आत्मपरिक्षण करून आपल्याच घरात पदं ठेवण यावर विचार करावा लागणार आहे .
इथून पुढच्या पदांच विकेंद्रीकरण न झाल्यास कार्यकर्ते नेते आणि त्यांच्या वारसानां घरी आराम करायला बसवणार हे नक्की …
सौजन्य : अनिल तळगुळकर रिपोर्टर आयबीएन लोकमत चंदगड