बेळगाव दि 9 : बी के मॉडेल शाळेचा विद्यार्थी प्रशांत हुलमनी याच्या गूढ़ मृत्यु नेमके कारण अध्याप स्पष्ट झाल नसून मयत विद्यार्थ्याच्या ग्रामस्थानी आणि संतप्त नातेवाईकानीं शाळा प्रशासनास जाब विचारुन शाळे समोर आंदोलन केल आहे. बुधवारी सायंकाळी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या प्रशांत चा मृतदेह बी के मॉडेल शाळेच्या मैदानात मिळाला होता . यानंतर कॅम्प पोलिस देखील या मृत्यु चे गूढ़ उकळण्याचा प्रयत्न करत आहेत . हा घातपात आहे विद्यार्थ्यानी केलेल्या मारहाणीतुन हा प्रकार घडला आहे किँवा आजाराने त्याचा मृत्यु झाला आहे याचा तपास पोलिस करताहेत .
गुरुवारी मयत प्रशांत पालक नातेवाईक आणि पीरनवाड़ी ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश तलवार आणि शिव सेना तालुका प्रमुख सचिन गोरल यांच्या नेतृत्वात् 200 हुन अधिक लोकांनी आंदोलन केल . पीरनवाड़ी येथील युवक कार्यकर्त्यानी बी के मॉडेल शाळा प्रशासनास जाब विचारला आणि निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यच कारण स्पष्ट करा अशी मागणी केली . यावेळी शाळा प्रशासनाने हा प्रकार शाळेच्या गेट बाहेर झाल असल्याच सांगून पोलीस योग्य तपास करतील अशी भूमिका मांडली तर पिरनवाड़ी येथील अन्दोलकानी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यातुन झालेल्या मारहाणीत हा प्रकार घडला असल्याचा आरोप करत जबाबदार विद्यार्थ्यावर कारवाई ची मागणी केली आहे.