बेळगाव दि २३ : अनेक वर्षांपासून प्रलंबित बेळगाव शहरा भोवतालच्या रिंगरोड ला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे या रोड ला अनुमती मिळण्याची शक्यता आहे, खासदार सुरेश अंगडी यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
यासंदर्भात अंगडी यांनी माहिती देताच गडकरी यांनी आपल्या विभागाला या प्रकल्पाचा आराखडा बनविण्याची सूचना केली आहे असे समजते. यामुळे हा रस्ता होऊन ट्रॅफिकच्या समस्येतून बेळगावकरांची सुटका होऊ शकते, खासदार अंगडी यांच्या प्रयत्नांना यश आल्यास ते शक्य होईल. या रिंग रोड साठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन बळकावली जाऊ नये नापीक जमीनीतून हा रोड काढला जावा तसेच कुणी लोक प्रतिनिधी च्या जमिनीला संपत्तीला भाव येण्र्यासाठी त्याचा जमिनीच्या शेजारून हा रोड काढला जाऊ नये अशी लोकातून मागणी होत आहे