बेळगाव दि १ : सध्या संपूर्ण शहरासमोर दूषित पाण्याचे संकट घोंघावत आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या वेगवेगळ्या कारणासाठीच्या खोदाया आणि ड्रेनेजच्या पाण्याची सरमिसळ सध्या त्रासदायक ठरत आहे.
या प्रकारचा फटका बसलेल्या भागात टँकरचे पाणी हा एकमेव पर्याय उरला आहे. दूषित पाण्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाणीपुरवठा विभाग आणि मनपाने लवकर लक्ष्य न दिल्यास परिस्थिती आणखी बिघडणार आहे.