बेळगाव दि १२ :भारताने सर्वात कमी वेळात बनवून मंगळावर पाठविलेल्या यानाचे सेन्सर बनवून आंतराष्ट्रीय पातळीवर कीर्ती मिळविलेल्या सर्वो कंट्रोल्स या बेळगावच्या कंपनीने आणखी एक गरुडझेप घेतली आहे. शनिवारी भारताने यशस्वी चाचणी पूर्ण केलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची लॉन्चिंग यंत्रणा कंपनीने बेळगावात तयार केली आहे.
उद्योजक दीपक धडोती आणि त्यांच्या टीम ने ही यशस्वी कामगिरी केली आहे. हे क्षेपणास्त्र ठराविक लक्ष्यावर दोन थरात संरक्षण लहरी तयार करून शत्रूचा मारा थोपविण्यात महत्वाची भूमिका निभावते, त्याचे रोपण बेळगावची औद्योगिक वसाहत उद्यम बाग येथे बनविण्यात आलेल्या यंत्रणेमुळे होते हि बाब बेळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवणारी अशीच आहे