बेळगाव दि १ : बेळगावातील एक मराठा लाख मराठा मोर्च्यास महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा मिळत आहे . महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्च्या कोअर कमिटी सदस्य आणि अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना चे पुणे जिल्हा अध्यक्ष आभा पाटील यांनी दूरध्वनी वर बेळगाव मराठा क्रांती च्या सदस्यांना संपर्क साधून आपल्या संघटनेचा पाठींबा व्यक्त करत हजारोंच्या संख्येने आम्ही बेळगावातील मराठा मोर्च्यात सामील होऊ आश्वासन दिल आहे .
मराठा क्रांती मोर्च्या बेळगाव चे प्रवक्ते गुणवंत पाटील यांनी बेळगाव लाईव्ह ला दिलेल्या एक्क्लुजीव माहितीत सांगितले की बेळगाव लाईव्ह वेब पोर्टल मध्ये मंगळवारी रात्री मराठा क्रांती मोर्च्या कमिट्या आणि त्यांचे मोबईल नंबर जाहीर करण्यात आले होते वेब साईट वर हे सर्व पाहून क्रांती मोर्च्या सदस्यांना संपर्क साधला आणि आपला पाठींबा बेळगावच्या मोर्च्यास व्यक्त केला आहे . अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना हे संघटना महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात कार्यरत असून मराठा महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शन खाली ही संघटना चालते . १७ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने बेळगावातील मूक मोर्च्यात सामील होणार आहेत .