बेळगाव दि २७ : रेकॉर्ड ब्रेक कर वसुली केल्यामुळे बेळगाव महापालिकेस नगर विकास खात्याने पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलय. विशेष मोहीम राबवून महापालिकेने स्थायी संपत्ती करातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळविले होते .
नगर विकास मंत्रालायन या कर वसुलीच्या कामाच कौतुक केल असून यापुढे बक्षीस म्हणून कर वसुली साठी नवीन प्रशासकीय पद्धत अमलात आणली जाणार आहे. पालिकेने गेल्या वर्षी ३२ कोटी रुपये कर वसुली केली होती. नगर विकास मंत्री रोशन बेग यांनी पालिका आयुक्त कुरेर यांना कर वसुलीचा पुरस्कार प्रदान केला आहे .