बेळगाव दि १० : बेळगाव शहरात ऑटो चालकाकडून होणारी प्रवाश्यांची लुट रोखा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराने केली आहे. जिल्हा न्यायालयाचे सिनियर सिव्हील न्यायाधीश किरण केणी यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे .
बेळगाव शहरात प्रवाश्याकडून ऑटो चालक भाड आकारतेवेळी अक्षरशा लुट करत आहेत मीटर प्रमाणे भाड आकारलं जात नाही इतकेच नाही तर युवा ऑटो चालक कडून तरुणींना अश्लील भाषेत छेढछाडी चे प्रकार देखील वाढले आहेत या सगळ्या वर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासनला अपयश आल आहे .
ऑटो चालकाकडून अनेक बेकायदेशीर काम होत आहेत एक परमिट वर दोन हून अधिक ऑटो चालवत आहेत या सगळ्याची चौकशी करा अस निवेदनात म्हटलं आहे. निवेदनाचा स्वीकार करून परिवाहन खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करू अस आश्वासन न्यायाधीश किरण केणी यांनी दिल. भ्रष्टाचार निर्मुलन परिवारचे अध्यक्ष सुजित मूळगुद यांच्या सह साजिद सय्यद, संजय पाटील संतोष कांबळे आदि यावेळी उपस्थित होते .