बेळगाव दि ०३: एस पी एम रोडवर छत्रपती शिवाजी उद्याना समोर मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो गॅलन पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. एक कामगार तेथे पाणी थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे .
शहर परिसरात पाणी टंचाई फेब्रुवारीच्या प्रारंभीच जाणवू लागली आहे.चार दिवसातून एकदा नळाला पाणी येत आहे.पण शहरात मात्र पाणी पुरवठा महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे रोज हजारो लिटर पाणी जलवाहिनीच्या गळतीमुळे,व्हॉल्व्ह फुटल्यामुळे वाया जात आहे महा पालिकेने याकडे लक्ष ध्याव अशी मागणी करण्यात येत आहे . पाणी वाचवा देश वाचवा ही मोहीम बेळगावात तरी फक्त यशस्वी होताना दिसत नाही .
एकीकडे पिण्याच्या पाण्याचे हाल सुरु असताना असे जलवाहिनी फुटून पाणी वाया जाणे दुर्दैवी ठरत आहे. पाणी पुरवठा थांबवून तातडीने दुरुस्तीची गरज आहे. अन्यथा पाणी वाया जाणार असून हे नुकसान भरून काढता येणार नाही. सततचे खोदाईचे काम आणि पाणी पुरवठा विभागाचे अक्ष्यम्य दुर्लक्ष याचा फटका वारंवार बसू लागला आहे. याकडे कधी लक्ष्य दिले जाणार हा प्रश्नच आहे.