बेळगाव दि २८ :कर्नाटक भागात हैद्राबाद मराठी भाषा आणि संस्कुती टिकवण्याच काम गेली ४० वर्ष कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत बेळगाव सीमा भागातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि हैद्राबाद कर्नाटक गुलबर्गा भागातील मराठीच्या समस्या वेगळ्या आहेत भाषा हे आदान प्रदान करण्याच माध्यम असून भाषा भाषात वैरत्व भाव असू नयेत अशी मत कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा डॉ भालचंद्र शिंदे यांनी व्यक्त केले .
मराठी भाषा दिन निमित्य पत्रकार विकास अकादमीच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळी शिंदे यांचा मराठी साठी दिलेल्या योगदानान बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गुलबर्गा येथल पत्रकार गुरय्या स्वामी, सलगरे उपस्थित होते. अकादमीचे विश्वस्थ प्रशांत बर्डे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकार प्रकाश बेळ्गोजी यांनी स्वागत केल यावेळी पत्रकार रमेश हिरेमठ, जितेंद्र पाटील पैलवान अतुल शिरोळे , मोद्गेकर आदी उपस्थित होते.
कर्नाटकात कन्नड आणि मराठी या दोन वेगवेगळ्या भाषा असल्या तरी त्या भाषात कधीच संघर्ष झाला नाही त्यामुळेच येथील बंधुभाव टिकून आहे असही शिंदे म्हणाले.