बेळगाव दि 29 : सीमा भागातील मराठी माणसाच्या हाकेला प्रतिसाद देत बेळगाव ला कधी ही यायची तयारी आहे अस आश्वासन कोल्हापुर राज्य सभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी दिल .
बेळगाव तालुक्यातील आम्बेवाड़ी गावात आयोजित चौथ्या मराठी सांस्कृतिक संवर्धन संमेलनात सहभागी झाल्या नंतर ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर आमदार संभाजी पाटील, महापौर सरिता पाटील, नगर सेविका मधुश्री पुजारी सह अन्य उपस्थित होते . सम्मलेनाची अध्यक्षता मासिक जडण घड़ण संपादक सागर देशपांडे होते .
शिवाजी राजे आणि शाहू राजे यांच्या रक्ताचा नव्हे तर विचारांचा वारसदार व्हायचं आहे शिवरायांची राजधानी रायगड च्या विकासासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. आपले पुढील उद्दिष्ट गडसंवर्धन हे आहे, असे राजे म्हणाले. सीमाभागातील असंख्य मराठीप्रेमी नागरिकांनी येथे गर्दी केली होती.