बेळगाव दि २९ : बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागामध्ये अलीकडे अनेक ठिकाणी ट्राफिक जम ची चित्र पाहायला मिळत आहे . माणिकबाग कडून फोर्ट रोड कडे येणारा मुख्य रस्ता उड्डाण पुलाच काम सुरु केल्याने बंद झाला आहे त्यामुळे लोकांनी पर्यायी मार्ग म्हणून तानाजी गल्ली `रेल्वे फाटक आणि नवीन कपिलेश्वर रोड उड्डाण पुलाचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे या दोन मार्गावर अतिरक्त ट्राफिक दबाव पडत आहे परिणामी अनेक ठिकाणी सरास जाम चे चित्र दिसत आहे त्यातच तानाजी गल्ली रेल्वेफाटक आणि शनी मंदिरा जवळ अनेकदा लोकांना ताटकळत थांबायची वेळ येत आहे .
तानाजी गल्ली रेल्वे फाटक आणि कपिलेश्वर रोड नवीन उड्डाण पुअला पैकी एका बाजूने वाहनांना प्रवेश देऊन होणारी ट्राफिक जाम कमी करता येते का याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण गरजेच बनल आहे या शिवाय भविष्यात कोणतीही उपाय योजना नसताना उड्डाण पुलाच काम सुरु करण्या आधी ट्राफिक नियोजन करणे गरजेचे आहे अश्या प्रतिक्रिया देखील सामान्य बेळगावकर जनता बोलताना दिसत आहे . शनी मंदिर ,फोर्ट रोड ,पाटील गल्ली , तानाजी गल्ली , कुलकर्णी गल्ली आदी भागात ट्राफिक पोलीस वाढविणे हाच एक सध्या पर्याय प्रशासनाने स्वीकारावा अशी मागणी केली जात आहे .