प्रजासत्ताक दिनी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर राष्ट्रध्वजा सोबत कन्नड संघटनाचा प्रतीक असलेला लाल पिवळा ध्वज दिवसभर फडकत होता .
राष्ट्रीय ध्वज संहिते अनुसार राष्ट्र ध्वज तिरंग्या पेक्षा अधिक उंचीवर कोणताही ध्वज फडकला जाऊ नये असा कायदा असताना कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर राष्ट्र ध्वज पेक्षा अधिक उंचीवर लाल पिवळा ध्वज फडकत होता . भारतीय राष्ट्र ध्वज चा हा अपमान नाही आहे का ?