बेळगाव दि ३० : बेळगाव जिल्हा अथलेटिक्स संघटना आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या वतीन बेळगावातील मुली साठी राजमाता जिजाऊ मिनी मरथोन स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे .आगामी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज येथे हि स्पर्धा घेण्यात येणार आहे . मराठा मंदिर पासून या मेरेथोन ला सुरुवात होणार आहे .
१२ वर्ष खालील मुलींच्या गटासाठी २ कि मी ,१४ वर्ष खालील मुलींच्या गटासाठी ३ कि मी तर १७ वर्ष खालील मुलीसाठी ४ कि मी आणि महिला साठी ६ कि मी अशी मिनी मरेथोन स्पर्धा आयोजित केली आहे .प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये , २ हजार , १ हजार , पाचशे , तीनशे, दोनशे आणि प्रमाण पत्र देण्यात येणार आहे अधिक माहिती साठी अप्पासाहेब गुरव सचिव मराठा मंदिर दूरध्वनी ९४८०४२२५२२ , ०८३१ २४२८९०७ शी संपर्क साधावा अस आवाहन केल आहे . राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य निर्मितीची कल्पना छत्रपती शिवाजी यांना योग्य ते शिक्षण देऊन प्रत्यक्षात साकार केली या राज मातेचा आदर्श सर्व महिला घ्यावा यासाठी तसेच देशात ऑलम्पिक दोन्ही पदक मुलीनी आणली त्यामुळे बेळगावातील मुलीना खेळ कडे आकर्षित करण्यासाठी मुलीना आपल आत्म संरक्षण स्वताच करता यावे यासाठी प्रेरणा म्हणून मुलीसाठी आणि महिला साठी मेरेथोन स्पर्धेच आयोजन केल आहे अशी माहिती मराठा मंदिराचे सचिव अप्पासाहेब गुरव यांनी दिली .