बेळगाव दि ३१ : बेळगाव सीमा प्रश्नाच्या मुख्य मागणीसह १७ फेब्रुवारी ला बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीन काढण्यात येणाऱ्या मराठाआणि मराठी क्रांती मोर्च्या ची जनजागृती मोहीम जोरदार पणे सुरु झाली आहे .मंगळवारी जत्ती मठात झालेल्या बैठकीत अनेक समित्याची स्थापना करण्यात आली आहे .
मराठा मोर्चा प्रवक्ता गुणवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये गावावात सभा बैठका लावण्यासाठी लोकांनी संपर्क साधण्यासाठी कमिटी नेमण्यात आली आहे यात सुनील जाधव( मो ०९९६४३७०२६१ ) संजय मोरे (मो ९४४८१६१६७९) गणेश दड्डीकर (मो ९८४४४९७०७९)सुरज कणबरकर (तर मध्य्वर्ती कार्यालयात राजू मर्वे, सतीश देसाई ,प्रकाश बापू पाटील, विनोद आंबेवाडीकर तर मिडिया आणि जनसंपर्क गुणवंत पाटील (मो ९७४०८६८१८१) यांची तर पोलीस परवानगी आणि जिल्हा प्रशासन समिती पदी विकास कलगटगी आणि सुनील आनंदाचे यांना नेमण्यात आले आहे .
खानापूर मध्ये मोठी बैठक
मराठा क्रांती मोर्चाची खानापूर मध्ये जन जागृती करण्यसाठी आगामी गुरुवार २ फेब्रुवारी रोजी खानापूर शिव स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून वसंतराव मुळीक मार्गदर्शन करणार आहेत . या शिवाय १० फेब्रुवारी बेळगावात मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज येथे मोठी जन संपर्क सभा होणार असून या सभेस कोल्हापूर येथून मधुकर पाटील आणि सुरेश दादा पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे .