बेळगाव लाईव्ह : बेळगाव टेक्नॉलॉजी कंपनीज असोसिएशनने (बीटका) आपल्या आगामी वार्षिक ‘बेळगाव टेक मीट -2025’ अर्थात बेळगाव तंत्रज्ञान मेळाव्याची घोषणा केली असून हा मेळावा येत्या शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता बेळगाव प्रेसिडेन्सी क्लब, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
चौथ्या आवृत्तीतील बेळगाव टेक मेळावा नवीन पद्धती, कल्पना किंवा उत्पादने सादर करणाऱ्या व्यक्ती (नवोन्मेषक), उद्योजक आणि कॉर्पोरेट नेत्यांसाठी बेळगावसारखी टियर-2 शहरे तंत्रज्ञानाचे भविष्य कसे घडवत आहेत हे दाखवण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ बनले आहे.
या वर्षीची “मानवी प्रभावासाठी तंत्रज्ञान” ही थीम बायोटेक्नॉलॉजीपासून बांधकाम, पाळीव प्राण्यांची काळजी आणि तंत्रज्ञानापर्यंत उद्योगांमध्ये नवोन्मेषक कसा अर्थपूर्ण बदल घडवू शकतो यावर भर देते. या कार्यक्रमात दोन गटांमध्ये चर्चा होतील. पहिला गट विषय – “भविष्याचा शोध : संस्थापक जीवन बदलणाऱ्या डीपटेक उत्पादनांची कशी निर्मिती करत आहेत” वक्ते : कवल अरोरा (संस्थापक देसी एलएलएम) आणि आकाश कुलगोड (संस्थापक डॉग्नोसिस).
हे उभयता भविष्यासाठी सखोल तंत्रज्ञान कसे परिवर्तनकारी उपायांना चालना देत आहे याबद्दल आपले मत व्यक्त करतील. दुसरा गट विषय : “टियर-२ पासून जागतिक स्तरावर : कॉर्पोरेट नेते आणि उद्योजकांचे सामायिक शिक्षण”
वक्ते : लीना पडिहारी (मालक आणि सीएफओ, अल्फानझाइम लाईफ सायन्स), शेखर गावकर (संस्थापक आणि सीईओ, पेटकार्ट), प्रणव शर्मा (एमडी, फेलिसिटी अॅडोब) आणि अल्लाहबक्ष (केंद्र प्रमुख, इन्फोसिस हुबळी आणि असोसिएट व्हीपी, इन्फोसिस). या गटचर्चाचे सूत्रसंचालन आदिल बंदुकवाला (व्हीपी, हॅकररँक) हे करणार असून या सत्रात लहान शहरांमध्ये जन्माला येणारे विचार जागतिक यश कसे मिळवू शकतात याचा शोध घेतला जाईल.
या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना बीटकाचे प्रवक्ते म्हणाले, “आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात नावीन्यपूर्णता केवळ महानगरे किंवा एकल उद्योगांपुरती मर्यादित राहिली नसून ती बायोटेक लॅबपासून बांधकाम स्थळांपर्यंत, पाळीव प्राण्यांच्या काळजी घेण्याच्या उपक्रमांपासून तंत्रज्ञान केंद्रांपर्यंत प्रत्येक कोपऱ्यातून उदयास येते.
बेळगाव टेक मेळावा (मीट) कॉर्पोरेट आणि उद्योजकीय क्षेत्रामध्ये दिशादर्शन केलेल्या नेत्यांना एकत्र आणते, स्थानिक कल्पनांचा जागतिक मानवी प्रभाव कसा असू शकतो हे दाखवते.” या कार्यक्रमात बेळगावच्या वाढत्या तंत्रज्ञान परिसंस्थेला आणखी गती मिळण्याच्या दृष्टीने बीटका सदस्य कंपन्यांद्वारे विशेष लाँच देखील केले जातील. विचारप्रवर्तक चर्चा, नेटवर्किंग संधी आणि ज्ञान सामायिकरण यांच्या मिश्रणासह बेळगाव टेक मीट -2025 व्यावसायिक, उद्योजक आणि नवोन्मेषकांसाठी एक अविरत व्यासपीठ असल्याचे आश्वासन देते.
मेळाव्यासंदर्भातील नोंदणी आणि अधिक तपशीलांसाठी https://tech-meet.betca.org येथे भेट द्यावी. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रश्नांसाठी हितेश (+919880936126) किंवा उदय (934110) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.



