belgaum

तुरमुरी कचरा डेपोमध्ये बालकामगार; स्थानिकांमध्ये संताप

0
501
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जिल्ह्यात कृषी क्षेत्रात बालमजुरीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात असताना खुद्द बेळगाव महापालिकेच्या तुरमुरी येथील कचरा डेपोच्या ठिकाणी बालकामगारांना कामासाठी जुंपले जात असल्याचा संतापजनक प्रकार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आज शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये कृषी क्षेत्रात बालमजुरीच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी विशेष बैठक पार पडली. स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ -इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) नवी दिल्ली येथील प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत शेतातील बालमजुरीचा वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

दुसरीकडे दोन दशकांपासून सुरू असलेल्या आणि स्वच्छ नैसर्गिक वातावरण प्रदूषित करणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या तुरमुरी कचरा डेपोबद्दल बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील संतप्त स्त्री-पुरुष युवकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. तसेच कचरा डेपो तात्काळ बंद किंवा स्थलांतरित करावा अशी जोरदार मागणी केली. या पार्श्वभूमीवर सदर कचरा डेपोच्या ठिकाणी कंत्राटदाराकडून अल्पवयीन मुलांना कामासाठी राबविले जात असल्याचा संतापजनक प्रकार आज शनिवारी स्थानिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकी झाला आहे.

 belgaum

कचरा डेपोच्या ठिकाणी कांही मुले कचरा विघटन वगैरे कामे करत असल्याचे निदर्शनास येताच तुरमुरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना प्रथम एकत्र केले. त्यानंतर तुम्ही या कचरा डेपोच्या ठिकाणी काय करत आहात? अशी विचारणा केली. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलांनी कंत्राटदार प्रशांत सर यांच्या सांगण्यावरून आम्ही येथे कचरा डेपोमध्ये काम करत आहोत असे उत्तर दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मुलांची वय जाणून घेतली असता ते अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

या पद्धतीने कचरा डेपोच्या ठिकाणी बालकामगारांना कामासाठी जुंपले जात असल्याबद्दल उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच बालकामगार कामगार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मुलांना कचरा डेपोमध्ये कामाला लावणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.