बेळगाव लाईव्ह :पाच्छापूर पुलापासून कुंदरगी पंप हाऊसपर्यंत नवीन आरडब्ल्यूटीएम एमएस पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले असल्यामुळे आज बुधवारी व उद्या गुरुवार दि 2 एप्रिल 2026 रोजी बेळगाव शहराचा नियोजित पाणी पुरवठा खंडित राहणार आहे.
पाच्छापूर पुलापासून कुंदरगी पंप हाऊसपर्यंत नवीन आरडब्ल्यूटीएम एमएस पाईपलाईनच्या आंतरजोडणी आणि कार्यान्वयनासाठी आज बुधवारी व उद्या गुरुवारी शहराचा नियोजित पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
यामुळे डेमो झोनसह शहरातील नियमित पाणी पुरवठा वेळापत्रक काम पूर्ण होईपर्यंत विस्कळीत राहील. पाणी पुरवठा खंडित होणारी क्षेत्रे डेमो झोनसह संपूर्ण उत्तर आणि दक्षिण बेळगाव शहर असणार आहे.
यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि या कालावधीत शहरातील रहिवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती महाव्यवस्थापक, एल अँड टी वॉटर सप्लाय बेळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.





