belgaum

शिवबसवनगर श्री जोतिबा मंदिरात चैत्रोत्सव भक्तिभावाने

0
77
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शिवबसवनगर, बेळगाव येथील एक पवित्र आणि जागृत देवस्थान श्री जोतिबा मंदिरामध्ये (ज्योतिर्लिंग देवस्थान) आज बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

चैत्र पौर्णिमेनिमित्त शिवबसवनगर, बेळगावचे श्री जोतिबा मंदिरा भक्तांनी फुलून गेले असून विविध धार्मिक विधींनी दिवसाची सुरुवात झाली आहे. मंदिरामध्ये आज सकाळी 6 वाजता श्री जोतिबा देवाला अभिषेक, पादपूजा आणि अलंकार पूजा भव्यतेने पार पडली. आज सकाळपासून मंदिरामध्ये देव दर्शनासाठी भक्तांची गर्दी पहावयास मिळत होती.

आता संध्याकाळी 8 वाजता महाआरतीचा सोहळा होणार असून ज्यात दीपप्रज्वलन करून दख्खनचा राजा श्री जोतिबा माऊलीची आरती केली जाणार आहे. हा उत्सव भक्तांना आध्यात्मिक उर्जा देणारा ठरला असून मंदिर समितीने सर्व भक्तांना त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 belgaum

दरम्यान चैत्र पौर्णिमा उत्सवानंतर 6 एप्रिल 2026 रोजी सासन काठी आगमन होईल आणि त्यानिमित्त दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त ज्या भाविकांना कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा यात्रेला भेट देताय आले नाही ते भावी बेळगाव शहरातल्या बेळगाव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येत असतात. सोमवार 6 एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराच्या ठिकाणी आज सकाळी बेळगाव लाईव्हशी बोलताना मंदिर व्यवस्थापन समितीचे ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी दरवर्षीप्रमाणे शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये चैत्र यात्रा साजरी करण्यात येत असून आज चैत्र पौर्णिमेचा मुख्य दिवस आहे. त्या अनुषंगाने सकाळी देवाला दवणा अर्पण करून पाद्यपूजा करण्यात आली.

त्याचप्रमाणे बेळगावची मानाची देवदादा सासनकाठी कोल्हापूरला गेली असून तिचे आगमन येत्या सोमवार दि. 6 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी होणार आहे. त्यानिमित्ताने त्या दिवशी दुपारी 12 ते 4 या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देऊन समस्त भक्तांनी मोठ्या संख्येने पालखीचे दर्शन, श्री ज्योतिबा दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.