belgaum

बेळगावात CNG व Auto LPG गॅस मुबलक

0
298
Roshan mohammad dc
 belgaum


बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी CNG आणि Auto LPG गॅसचा तुटवडा असल्याच्या बातम्यांनंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्टिकरण देत कोणताही गॅस तुटवडा नसल्याचे सांगितले आहे.

१ एप्रिल रोजी विविध माध्यमातून प्रसारित झालेल्या वृत्तानंतर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शहरातील एकूण सहा गॅस पंपांची पाहणी केली. या तपासणीत सर्व पंपांवर CNG आणि Auto LPG गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

 belgaum

दरम्यान, आरटीओ सर्कल येथील ‘शिल्पा गो गॅस’ पंपावर गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नोझल’मध्ये बिघाड झाल्याने काही काळ अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळे ऑटोचालकांना गॅस मिळण्यात अडथळे आले होते. मात्र, संबंधित पंप मालकांनी नोझलची दुरुस्ती करून समस्या पूर्णपणे सोडविल्याचे लेखी स्वरूपात प्रशासनाला कळवले आहे.

जिल्ह्यात कुठेही CNG किंवा Auto LPG गॅसची कमतरता नसून ऑटोचालकांनी कोणतीही अफवा किंवा भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.