belgaum

बेळगाव जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगार तडीपार

0
684
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अमली पदार्थांची विक्री आणि गंभीर गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना बेळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. शहरात गांजा विक्री, खून आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध सुरू असलेल्या कडक कायदेशीर मोहिमेचा हा एक भाग आहे.

पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, हे पाचही आरोपी सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेले होते. कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ५५ आणि ५६ अन्वये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिराजी यल्लाप्पा यसूचे याला ६ महिन्यांसाठी, टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यश गणेश दावले आणि आदित्य गणेश दावले यांना प्रत्येकी ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तसेच उद्यमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संतोष गोविंद दिवटीगी याला ६ महिन्यांसाठी आणि बेळगाव ग्रामीण हद्दीतील रफिक मोहम्मद रफिक शेख याला ३ महिन्यांसाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

 belgaum

या सराईत गुन्हेगारांविरुद्ध खुनाचे प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, प्राणघातक हल्ले आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेषतः संतोष दिवटीगी याच्यावर ५ गंभीर गुन्हे, तर पिराजी यसूचे याच्यावर ४ एनडीपीएस प्रकरणांसह अनेक गुन्हे नोंद आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावले उचलली जात आहेत. तडीपार करण्यात आलेल्या कालावधीत या गुन्हेगारांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करण्यास बंदी असेल. यापुढेही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.