belgaum

एम. बी. देसाई अँड सन्स फ्रुट कंपनीकडे हापूस मोठ्या प्रमाणात दाखल

0
396
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या होलसेल फ्रुट मार्केटमधील आंब्याचे प्रमुख व्यापारी एम. बी. देसाई अँड सन्स फ्रुट कंपनीकडे आज शनिवारी कोकणातील हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून आज प्रति डझन हापूसचा दर प्रति डझन 500 पासून 2000-2200 रुपयांपर्यंत झाला आहे.

बेळगाव होलसेल फ्रुट मार्केट मधील एम. बी. देसाई अँड सन्स फ्रुट कंपनीकडे प्रामुख्याने कोकणामधील दर्जेदार आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. तथापी यंदा प्रतिकूल हवामानामुळे बागेतील आंबे खराब होऊन आवक कमी झाली असली तरी आज शनिवारी देसाई कंपनीकडे तीन ते चार हजार बॉक्स इतकी हापूस आंब्याची आवक झाली.

यामध्ये कोकणातील केसर हापूस आंबा अधिक प्रमाणात आहे. प्रतिकूल हवामानामुळे आंब्याची आवक कमी झाली असल्याने पूर्वी कोकणातून बेळगावच्या फ्रुट मार्केटमध्ये दररोज दाखल होणारा आंबा आता शनिवार आणि बुधवार अशा आठवड्यातील फक्त दोन दिवशी येत आहे. त्यानुसार आज शनिवारी एम. बी. देसाई अँड सन्स यांच्याकडे हापुस आंब्याची चांगली आवक झाली आहे. त्यामुळे आंबा खरेदीसाठी शहरातील व्यापाऱ्यांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळत होते.

 belgaum

आंब्याची आवक आणि दरासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना एम बी देसाई अँड सन्स फ्रुट कंपनीचे संचालक संदीप देसाई यांनी यावर्षी आंब्याची आवक कमी झाली आहे. पूर्वी दररोज होणारी आंब्याची आवक आता आठवड्यातील फक्त बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी होत आहे.

आवक कमी असल्यामुळे बाजारपेठेत आंब्याचा दर प्रति डझन 500 ते 2000 रुपयांपर्यंत स्थिर असल्याचे सांगितले. आंब्याचे व्यापारी खानजादे यांनी सांगितले की, आज आंब्याची आवक चांगली असून यंदा प्रतिकूल हवामानामुळे बागेतील आंबे खराब होऊन आवक कमी झाली आहे त्यामुळे सध्या 500 ते 2000 रुपयांपर्यंत सुरू आहे. गुणवत्तेनुसार आंब्याचा दर ठरतो. त्यामुळे आज एक नंबरचा माल असलेल्या ब्रॅण्डेड हापुस आंब्याचा दर 2000 ते 2200 रुपयांपर्यंत प्रति डझन आहे. तसेच साधा हापुस आंबा 400-500 रुपयांपासून 1200 -1500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. आज एमबी देसाई अँड सन्स कंपनीकडे 3000 ते 4000 बॉक्स इतकी आंब्याची आवक झाली आहे.

आमच्याकडे मालवण वेंगुर्ला कोचरा देवगड रत्नागिरी अशा कोकण भागातून आंब्याची आवक होते. यामध्ये फक्त हापूस आंबाच नाहीतर गोवा मानकूर, पायरी वगैरे जातीच्या आंब्याचा ही समावेश असतो अशी माहिती देऊन कोकणातील आंबा बेळगावच्या बाजारपेठेत मे अखेरपर्यंत उपलब्ध असतो असे खानजादे यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.