belgaum

घार्ली क्रॉसजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, ट्रकचालक फरार

0
155
Road accident logo
Road accident logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर रामनगर–अळ्ळनावर मार्गावरील घार्ली क्रॉस येथे बुधवारी दुपारी सुमारे 3.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहन न थांबवता घटनास्थळावरून पसार झाला असून, या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव बाळकृष्ण यशवंत चौधरी (वय 60, रा. मालंबा, ता. जोयिडा, जि. उत्तर कन्नड) असे असून, ते लुना (क्रमांक KA-65/…-9968) या दुचाकीवरून अळ्ळनावरकडून रामनगरकडे जात होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, HR-55/AU-1441 क्रमांकाचा कंटेनर ट्रक अळ्ळनावरकडून रामनगरकडे अतिवेगाने व निष्काळजीपणे येत असताना घार्ली क्रॉसजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रकच्या डाव्या पुढील भागाची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर दुचाकीस्वार खाली पडले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 belgaum

अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 115/2026 अंतर्गत भादंवि कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 सह 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आर. एस. सपाटे करीत असून, फरार ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.