बेळगाव लाईव्ह :मिशन ऑलिम्पिक संघटनेच्या यांच्या वतीने रविवार दिनांक ८ मार्च रोजी आनंदवाडी आखाडा, बेळगाव येथे भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात महाराष्ट्र व कर्नाटकासह विविध राज्यांतील नामांकित मल्ल सहभागी होणार असून तब्बल ६० हून अधिक जोड लावण्यात येणार आहेत.
प्रमुख कुस्त्यांची लढत
प्रथम क्रमांकासाठी बाळू अपराध (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध हरिश कुमार (हरियाणा केसरी) यांच्यात रंगतदार लढत होणार आहे.
द्वितीय क्रमांकासाठी कामेश पाटील, कंग्राळी (कर्नाटक कंठीरेवा) विरुद्ध हितेश पाटील (आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता, पुणे) यांच्यात सामना रंगेल.
तृतीय क्रमांकासाठी दिग्विजय जाधव (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध प्रेम जाधव (कर्नाटक चॅम्पियन) यांच्यात कुस्ती होणार आहे.
चौथ्या क्रमांकासाठी पार्थ पाटील (कंग्राळी) विरुद्ध बबलू नरळे (सातारा),
पाचव्या क्रमांकासाठी प्रथमेश हट्टीकर (कंग्राळी) विरुद्ध धीरज पाटील (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे),
सहाव्या क्रमांकासाठी कार्तिक (इंगळगी) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (कंग्राळी),
सातव्या क्रमांकासाठी विनायक (येळ्ळूर) विरुद्ध राजू (शिनोळी) यांच्यात सामने होणार आहेत.
याशिवाय भूमिपुत्र (मुतगा) विरुद्ध ध्रुव (मण्णीकेरी), संभाजी (काकती) विरुद्ध इंद्रजित शेळके (सांगली), प्रणव (उचगाव) विरुद्ध विपुल जावलकर (पुणे) अशा अनेक रोमांचक लढतींचा समावेश आहे.

महिला दिनानिमित्त महिलांची जंगी कुस्ती
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विशेष कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील नामांकित महिला मल्ल या मैदानात सहभागी होणार आहेत.
प्रितम दाभाडे (महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे) विरुद्ध सुजाता हल्याळ (कर्नाटक चॅम्पियन),
प्रांजल तुळजाई (बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल) विरुद्ध रिंकू नलवडे (पुणे),
खुशी खादरवाडी विरुद्ध रुतुजा रावळ (शहापूर),
भक्ती गावडा (मोदेकोप) विरुद्ध रिया बस्तवाड,
श्रुती खादरवाडी विरुद्ध प्रनोती पाटील (कोल्हापूर),
सुश्मा शिंदे (खादरवाडी) विरुद्ध सई किल्लेकर (मजगाव),
समिधा बिर्जे (वडगाव) विरुद्ध प्रितम हूले (पुणे) अशा १५ हून अधिक महिला कुस्त्या रंगणार आहेत.
आकर्षक आणि उद्घाटन कुस्त्या
आकर्षक कुस्तीत श्रेयस हट्टीकर, गगन अलारवाड (भारतीय वायुसेना स्पोर्ट्स स्कूल) विरुद्ध पांडू तुर्केवाडी यांच्यात सामना होईल. तसेच प्रभा खादरवाडी विरुद्ध कल्याणी अंबोळकर, प्रांजल बिर्जे विरुद्ध रिया (बेळगाव) यांच्यातील महिला लढतीही लक्षवेधी ठरणार आहेत.
उद्घाटन कुस्ती साई गावडे (मुचंडी) विरुद्ध सम्राट पाटील (बेनकनहळ्ळी) तर राजवीर पाटील (मंडोळी) विरुद्ध शेखर खादरवाडी यांच्यात होणार आहे.
या जंगी कुस्ती मैदानाचा लाभ सर्व कुस्ती शौकिनांनी घ्यावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष पै. अतुल शिरोळे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.





