belgaum

राज्य वकील परिषदेसाठी उद्या मतदान प्रक्रिया

0
304
advocate logo
advocate logo
 belgaum


बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य वकील परिषदेची पंचवार्षिक निवडणूक उद्या, बुधवारी (दि. ११) पार पडणार असून, बेळगाव जिल्ह्यातून आठ वकील नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी बेळगाव जिल्हा बार असोसिएशनकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यातील ३१ जिल्ह्यांतून एकूण १४९ जण आपले नशीब आजमावत आहेत. राज्यातील एकूण २५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत चुरस वाढली असून, सुमारे ७०,४४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक ६८ उमेदवार बेंगळुरू शहरातून निवडणूक लढवत असून, एका जागेसाठी सरासरी सहा उमेदवार रिंगणात असल्याने उमेदवारांच्या प्रचार कौशल्याचा कस लागला आहे. या निवडणुकीत बेळगावातून विनय मांगलेकर, एस. एस. किवडसण्णावर, सुमिता पाटील, चन्नबसाप्पा बागेवाडी, ईश्वर पाटील, विनोद पाटील, शिल्पा सवदत्ती आणि कलमेश किवड हे आठ वकील आपले नशीब आजमावत आहेत.

महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र मतपत्रिका न काढता, मुख्य मतपत्रिकेतच त्यांच्या नावासमोर ‘डब्ल्यू’ (W) असा उल्लेख करण्याचा निर्णय इंडियन बार कौन्सिलने घेतला आहे. एकाच मतपत्रिकेमुळे अवैध मतदानाची भीती व्यक्त होत असली, तरी प्रशासनाने त्यादृष्टीने स्पष्टीकरण दिले आहे.

 belgaum

गेल्या दीड महिन्यापासून ३१ जिल्ह्यांसह सर्व तालुक्यांमध्ये फिरून उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे. राज्यातील प्रत्येक मतदाराला एकूण २३ उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. या कसरतीनंतर आता बुधवारी वकील वर्गाचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.