belgaum

…तर मी स्वतः कर्नाटक सरकारची भेट घेईन -मंत्री उदय सामंत

0
585
Uday samant
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारत-न्यूझीलंड विश्व कप क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या विद्युत संवाद जय जय महाराष्ट्र माझा गाणं म्हटल्यानंतर कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांवर घातलेल्या केस नंतर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेल्या आहेत.

बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन नक्की घेईल. वेळ पडल्यास कर्नाटक सरकारला विनंती करण्यासाठी, काही गोष्टी सांगण्यासाठी आम्ही कर्नाटकला जाऊ. मी स्वतः कर्नाटकला जाईन, असे महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ गीत गायल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात ते मुंबई येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री म्हणून सीमा प्रश्नात लक्ष घालीन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वी यामध्ये लक्ष घातलं होतं.

 belgaum

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यामध्ये लक्ष घालतील. आपल्या तिथल्या मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ.

वेळ पडल्यास कर्नाटक सरकारला विनंती करण्यासाठी, काही गोष्टी सांगण्यासाठी आम्ही कर्नाटकला जाऊ. मी स्वतः कर्नाटकला जाईन. तिथल्या विशेष करून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये ही भूमिका देखील महाराष्ट्र शासन म्हणून युतीच्या सरकारची नक्की आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी पुढे नमूद केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.