belgaum

हिडकल जलाशयात पोहायला गेलेल्या दोन चिमुरड्यांना जलसमाधी!

0
630
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शाळेला सुट्टी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील हळेगुडनट्टी गावाजवळ ही दुर्घटना घडली असून, उन्हाळी सुट्टीच्या पहिल्याच दिवशी दोन घरांचे दिवे विझल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ददाबानट्टी येथील आर.सी. सेंटर गावातील पाच मित्र सोमवारी दुपारी कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी हळेगुडनट्टी येथील देवस्थानाजवळ असलेल्या हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये पोहायला गेले होते.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा विठ्ठल खानापुरे (१४) आणि प्रज्वल गोकार (१४) हे दोन तरुण खोल पाण्यात ओढले गेले. सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरड केली, पण पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने या दोघांना वाचवता आले नाही.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. हसत्या-खेळत्या मुलांचे पार्थिव घरी येताच पालकांनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता.

मुलांनी जलाशयाच्या किंवा नदीच्या पात्रात उतरताना मोठी जोखीम पत्करू नये, असे आवाहन आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.