belgaum

राज्याच्या कनिष्ठ पुरुष, महिला हॉकी संघ निवड चांचणीसाठी आवाहन

0
136
hockey bgm
hockey bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी 16 व्या हॉकी इंडिया कनिष्ठ पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद -2026 या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा पुरुष व महिला संघ निवडण्यासाठी हॉकी कर्नाटक संघटनेने बेंगलोर येथे येत्या सोमवार दि. 16 व मंगळवार दि. 17 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे.

आगामी 16 वी हॉकी इंडिया कनिष्ठ पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद -2026 ही स्पर्धा येत्या दि. 1 ते दि. 12 एप्रिल 2026 या कालावधीत रांची, झारखंड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा कनिष्ठ पुरुष व महिला संघ निवडण्यात येणार असून ही निवड चांचणी येत्या 16 व 17 मार्च रोजी एफएमकेएमसी, हॉकी एरिना, शांतीनगर बेंगलोर येथे सकाळी 9:30 वाजल्यापासून घेतली जाणार आहे.

सदर निवड चांचणीसाठी 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले हॉकीपटू पात्र असणार आहेत. निवड चांचणी दरम्यान ज्या खेळाडूंची निवड होईल ते माघारी न परतता दि. 31 मार्च 2026 पर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील, हॉकी कर्नाटक संघटनेने आपल्या अधिकृत पत्रकाद्वारे हे स्पष्ट केले आहे. तरी बेळगाव जिल्ह्यातील पात्र हॉकीपटुुंनी याची नोंद घेऊन निवड चांचणीला वेळेवर उपस्थित रहावे.

 belgaum

त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी बेळगाव जिल्हा हॉकी संघटना अर्थात हॉकी बेळगावचे सरचिटणीस सेवानिवृत्त सुभेदार सुधाकर चाळके (9823425260) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हॉकी बेळगावतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.