belgaum

गुणांऐवजी दहावी तृतीय भाषा परीक्षेचे होणार श्रेणीकरण

0
311
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या सुरू असलेल्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या येत्या दि. 31 मार्च 2026 रोजी होणाऱ्या तृतीय भाषा परीक्षेला बसणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असून गुणांऐवजी या परीक्षेचे श्रेणीकरण केले जाणार आहे.

भगवान महावीर जयंती निमित्त निमित्त सुट्टीमुळे एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेचा तृतीय भाषा विषयाचा पेपर दि. 30 ऐवजी दि. 31 मार्च रोजी 2026 होणार असल्याचे कर्नाटक शाळा

परीक्षा आणि मूल्यमापन मंडळांने जाहीर केल्यानंतर आता कर्नाटक सरकार शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने उपरोक्त घोषणा केली आहे.

 belgaum

एसएसएलसी तृतीय भाषेच्या पेपरसाठी एकूण गुणांसाठी गुण न देता म्हणजे थोडक्यात उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असे कांही न करता ए, बी, सी अशी श्रेणीकरण प्रणाली वापरली जाणार आहे.

तथापि विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी तृतीय भाषा विषयाच्या परीक्षेला बसणे अनिवार्य असणार आहे, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.