belgaum

सीमाभागातील गिरणी कामगार मुंबईकडे रवाना

0
340
 belgaum


बेळगाव लाईव्ह :
मुंबईतील गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत श्रमिक संघटनेच्या वतीने पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून त्यासाठी सीमाभागातील गिरणी कामगार मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी ७ मार्च रोजी बेळगाव येथील बोडकेनहट्टी येथे जागृती बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर आज सीमाभागातील विविध गावांमधील कामगार मुंबईकडे प्रयाण झाले.

 belgaum

चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर तसेच चंदगड तालुक्यातील कुर्णी, गुजवडे, कोवाड, सतेवाडी, अडकूर आदी गावांतील गिरणी कामगार या आंदोलनासाठी रवाना झाले आहेत.

यावेळी मनोहर हुंदरे, शिवाजी हुंदरे, दरशथ घाटगे, संजीव कुमार, अतुल दिघे, केदारी पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.