belgaum

सांबऱ्याच्या समिपता जत्राटीचे दैदिप्यमान यश

0
1293
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास यश मिळत नाही, हा समाजातील गैरसमज सांबरा येथील समिपता जत्राटी हिने आपल्या कर्तृत्वाने पुसून टाकला आहे.

बेळगावमधील नामांकित लिंगराज कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अकरावी वाणिज्य शाखेच्या वार्षिक परीक्षेत समिपताने ५९५ गुण मिळवून ९९.१७% गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

समिपताचे हे यश कौतुकास्पद ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची शैक्षणिक पार्श्वभूमी. तिने सांबरा येथील मराठी सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले, तर माध्यमिक शिक्षण निलजी येथील रणझुंझार हायस्कूलमधून पूर्ण केले.

 belgaum

पूर्णपणे मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर, बेळगावमध्ये अकरावीत प्रवेश घेतल्यावर तिने इंग्रजी माध्यमातून अभ्यास सुरू केला. भाषेचे माध्यम बदललेले असतानाही, समिपताने अत्यंत चिकाटीने अभ्यास करून ९९.१७% गुणांची कमाई केली.

समिपताच्या या यशाने ‘मातृभाषेतून शिकणारी मुले मागे पडतात’ या धारणेला छेद दिला आहे. “मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याची आमच्या कुटुंबाची धारणा होती, ती समिपताने सार्थ ठरवली आहे,” अशी भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तिच्या या यशामुळे सांबरा आणि निलजी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. समिपताच्या या देदीप्यमान यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.