belgaum

श्रीशैलहून परतताना भीषण अपघात; एकसंबा येथील तिघांचा मृत्यू

0
607
Road accident logo
Road accident logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्रीशैल दर्शन करून परत येत असताना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथील यात्रेकरूंवर दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 544 वर जंगमगुंटला गावाजवळ क्रुझर वाहन आणि केळीने भरलेल्या मिनी ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये अजित सातवर, अलका शिंदे आणि गौरव शहा (सर्व रा. एकसंबा) यांचा समावेश आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून इतर काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताच्या वेळी क्रुझर वाहनात एकूण 14 यात्रेकरू प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एकसंबा येथून हे सर्वजण श्रीशैल येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना मार्कपुरमजवळील जंगमगुंटला गावानजीक केळीने भरलेल्या मिनी ट्रकला क्रुझरची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या धडकेत क्रुझर वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतांचे पार्थिव मार्कपुरम येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आंध्र प्रदेश पोलीस करत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे एकसंबा गावावर शोककळा पसरली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.