belgaum

Star Air कडून बेळगाव–मुंबई व बेळगाव–जयपूर विमानसेवा होणार सुरू

0
148
Star air
Star Air wins the Highest average passenger load factor on RCS flights
 belgaum

बेळगाव लाईव्ह: उन्हाळी मोसमात बेळगाव विमानतळावरून विमानसेवा वाढत असून Star Airने 29 मार्च 2026 पासून बेळगाव–मुंबई दररोज तर बेळगाव–जयपूर त्रैवारिक विमानसेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इंडिगोने नवी मुंबई ते बेळगाव अशी दररोज ची विमानसेवा 29 मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केली असताना स्टार एरणे देखील मुंबई मधून विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

🛫 बेळगाव–मुंबई (दररोज)

  • S5111 : बेळगाव (IXG) 07:20 सकाळी ➝ मुंबई (BOM) 08:25
  • S5112 : मुंबई 19:45 सायं ➝ बेळगाव 20:50

व्यावसायिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे.

🛫 जयपूर–बेळगाव–जयपूर (मंगळ, गुरू, रविवार)

  • जयपूर 04:50 पहाटे ➝ बेळगाव 07:05 सकाळी
  • बेळगाव 21:40 रात्री ➝ जयपूर 23:55 रात्री

जयपूरहून पहाटे आगमन आणि रात्री परतीची सोय असल्याने दोन्ही शहरांतील प्रवाशांना दिवसाचा पूर्ण लाभ घेता येणार आहे.

नवीन वेळापत्रकामुळे बेळगावचे मुंबई व जयपूरशी हवाई संपर्क अधिक मजबूत होणार असून उद्योग, पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.