belgaum

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्या पूर्ततेकडे; फक्त कांही मोजकेच प्रकल्प शिल्लक

0
208
belagavi-smart-city-logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटीज मिशन (एससीएम) अंतर्गत मंजूर झालेले बहुतांश प्रकल्प बेळगावने पूर्ण केले असून त्यापैकी 98 टक्के कामे आधीच पूर्ण झाली आहेत आणि उर्वरित कांही अंमलबजावणीच्या मार्गावर आहेत, असे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज राज्यसभेत स्पष्ट केले.

खासदार इरन्ना कडाडी यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने बेळगावमधील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली. मंत्रालयाने स्पष्ट केले की, बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला (बीएससीएल) केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून शहराला वाटप केलेल्या एकूण केंद्रीय वाट्याच्या 100 टक्के म्हणजे 490 कोटी रुपये मिळाले आहेत.

ही संपूर्ण रक्कम आधीच वापरली गेली आहे. स्मार्ट सिटीच्या 2,780 कोटी रुपयांच्या एकूण 217 प्रकल्पांपैकी 2,722 कोटी रुपयांचे 212 प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 58 कोटी रुपयांचे पाच प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या मार्गावर आहेत.

 belgaum

बीएससीएल संबंधीत प्रमुख प्रकल्पांमध्ये, एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) आणि हेरिटेज पार्क पहिला टप्पा आणि तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. हेरिटेज पार्क दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. मंत्रालयाने असेही स्पष्ट केले की प्रश्नात नमूद केलेली टिळकवाडी मास्टर प्लॅन, व्हॅक्यूम सीवर नेटवर्क आणि 24×7 पाणीपुरवठा पायलट प्रकल्प ही कामे स्मार्ट सिटीज मिशनचा भाग नाहीत.

स्मार्ट सिटी उपक्रमांच्या परिणामांबद्दल सरकारने सांगितले की, कर्नाटक शहरी पायाभूत सुविधा विकास आणि वित्त महामंडळ लिमिटेड (केयुआयडीएफसी), नोडल एजन्सीने कर्नाटक मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन अथॉरिटीची (केएमइए) नियुक्ती केली आहे.

जेणेकरून या प्रकल्पांमुळे बेळगावमधील जीवनमान कसे सुधारले आहे याचे मूल्यांकन केले जाईल. अद्ययावतिकरणावरून असे दिसून येते की बेळगाव त्याच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पूर्ततेनजीक पोचले असून फक्त काही मोजके प्रकल्प पूर्ण करायचे आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.