belgaum

पीओपी गणेश मूर्ती उंचीवर मर्यादा, डॉल्बीबंदीवर कडक भूमिका;

0
544
 belgaum

बेळगाव लाईव्ह: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी गणेश मूर्तीची उंची आणि डॉल्बीबंदी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शहरातील गणेश महामंडळे, मूर्तिकार आणि मंडळ अध्यक्षांची संयुक्त बैठक पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडली.

या बैठकीला डीसीपी नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मध्यवर्ती गणेश महामंडळ, लोकमान्य गणेश महामंडळाचे पदाधिकारी आणि शहरातील प्रमुख गणेश मूर्तिकार उपस्थित होते. गणेशोत्सवाला अजून पाच महिने शिल्लक असतानाच संभाव्य अडचणी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही पूर्वतयारी बैठक आयोजित केली होती.

बैठकीत पोलीस प्रशासनाने पीओपी गणेश मूर्ती संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन करत मूर्तीची उंची १५ फूटांपेक्षा अधिक ठेवू नये, अशी विनंती मूर्तिकारांना केली. यामुळे विसर्जन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले.

 belgaum


दरम्यान, शहराच्या उपनगर आणि ग्रामीण भागातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर कपिलतीर्थ तलावावर येतात. त्यामुळे त्या-त्या भागातच विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी यावेळी केली.

डॉल्बीबंदीच्या निर्णयाचे स्वागत करताना रमाकांत कोंडुसकर यांनी प्रशासनाने सर्वांना समान नियम लागू करावेत, अशी मागणी केली. गणेशोत्सवापुरतीच डॉल्बीबंदी न ठेवता इतर संघटनांनाही ती लागू करावी, अन्यथा दुय्यम वागणूक दिल्याची भावना निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कोणत्याही परिस्थितीत डॉल्बीबंदीची अंमलबजावणी केली जाईल, तसेच सर्वांना समान वागणूक दिली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी पीओपी मूर्ती आणि डॉल्बीबंदी संदर्भात सखोल मार्गदर्शनही केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.