belgaum

कंग्राळी येथे गांजा विक्री करणारे दोघे गजाआड; 1 लाखाचा गांजा जप्त

0
549
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह:कंग्राळी बी.के. (ता. जि. बेळगाव) गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा युवकांना बेळगाव सीसीबी पोलिसांनी काल अटक करून त्यांच्याकडील 1 लाख रुपये किमतीच्या गांजासह एकूण 1,00,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे कार्तिक भरत चिखलकर (वय 29, रा लक्ष्मी गल्ली, कंग्राळी बी.के.) आणि प्रकाश अर्जुन बगारी (वय 20, रा. भारत गल्ली मुचंडी, ता. बेळगाव) अशी आहेत. हे दोघेजण काल शुक्रवारी कंग्राळी बिके गावातील लक्ष्मी गल्ली येथील सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी गांजाची विक्री करत होते,

त्यावेळी बेळगाव सीसीबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून कार्तिक व प्रकाश यांना रंगेहात पकडले तसेच त्यांच्या जवळील एक लाख रुपये किमतीचा एक किलो 920 ग्रॅम गांजा आणि सातशे रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण एक लाख 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

दरम्यान, मार्केट पोलिसांनी काल शहरातील एका मटका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून तिघा जणांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रियाज अब्दुल रहमान घीवाले (वय 40, रा. घी गल्ली बेळगाव), सुलेमान बाबुल अत्तार (वय 29, रा. आंबेडकर गल्ली काकती) आणि फईम जलानी कोतवाल रा. खंजर गल्ली मोडक्या बाजार शेजारी, बेळगाव) अशी आहेत. हे तिघेही जण स्वतःच्या स्वार्थासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या पैशावर मटका जुगार खेळताना त्यांना मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अन्य एका प्रकरणात बेळगाव शहरातील बागवान गल्ली जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेत विचित्र वर्तन करणाऱ्या अब्दुलखादर अकबरसाब बुदिहाळ (वय 36, रा बागवान गल्ली बेळगाव) याला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. मार्केट पोलीस ठाण्याचे मुख्य हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ माळगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.