बेळगाव लाईव्ह :पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपयांपर्यंत, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून शून्य रुपयांपर्यंत करण्यात आले आहे.
या शुल्क कपातीमुळे इंधनाच्या किमती कमी होतील हे दावे दिशाभूल करणारे आहेत. उत्पादन शुल्कातील या कपातीमुळे ग्राहकांसाठी पेट्रोल, डिझेलचा किरकोळ दर कमी होण्याची शक्यता नाही.
उलट वाढत्या जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींचा समतोल साधणे आणि इंधनाच्या दरात होणारी मोठी वाढ रोखणे, हा यामागील उद्देश आहे.
हे पाऊल उचलले गेले नसते तर तेल कंपन्यांना किमती वाढवाव्या लागल्या असत्या. परिणामी जनतेवरील भार थेट वाढला असता.





