belgaum

ग्रामीण आणि सीसीबीच्या कारवाईत आरोपीला अटक

0
578
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलीस आणि सीसीबी पथकाने संयुक्त कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात एका आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्याकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पिरनवाडी येथील सिद्धेश्वर गल्लीत राहणारा मानस मनोहर कदम आणि समर्थ नगरचा रितिक पाटील हे दोघे मध्य प्रदेशातील सुनील कलगाट याच्याकडून गांजा आणत असत.

महाराष्ट्र-इंदूर सीमेवरून हा गांजा आणून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे सार्वजनिक ठिकाणी विक्री करत असताना सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.

 belgaum

या कारवाई दरम्यान रितिक पाटील हा फरार झाला असून मानस कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मानस कदम याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १०० ग्रॅम गांजा, डिजिटल वजन काटा आणि मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

या प्रकरणात फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.