belgaum

राष्ट्रीय पातळीवर अंजली निंबाळकर यांची छाप

0
206
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथील इंदिरा भवन येथे आयोजित ओबीसी काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनात देशभरातून आलेल्या महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

या अधिवेशनात खानापूरच्या काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी प्रभावी भाषण करत उपस्थितांचे लक्ष वेधले.

ओबीसी समाजातील महिलांचे सशक्तीकरण, राजकारणातील सहभाग आणि सामाजिक न्याय या विषयांवर त्यांनी आपले मत मांडले.

 belgaum

त्यांच्या भाषणाला उपस्थित नेते आणि प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात सहभाग घेऊन अंजली निंबाळकर यांनी खानापूरसह सीमाभागाचे प्रतिनिधित्व करत काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली.

या अधिवेशनात विविध राज्यांतील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि काँग्रेस नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजातील महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.