belgaum

खामेनेईचे पोस्टर्स काढा; अन्यथा अफजल खान वध नेतान्याहूचे पोस्टर्स लावू –

0
436
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात लावण्यात आलेले इराणचे सर्वोच्च नेते खेमेनाई यांचे पोस्टर्स तात्काळ हटवावेत; अन्यथा बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खान वधाचे तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूचेयांचे पोस्टर्स लावू, असा इशारा श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला.

शनिवारी बेळगाव सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरात लावण्यात आलेल्या खामेनेई यांच्या पोस्टर्सबाबत पोलिस प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

मुतालिक म्हणाले, खामेनेई यांचे पोस्टर्स काढून टाकण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र चार दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणात पोलिस प्रशासन मुहूर्त शोधत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 belgaum

पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून शहरातील संबंधित पोस्टर्स हटवावेत. अन्यथा आम्ही स्वतः शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खान वधाचे पोस्टर्स तसेच इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे पोस्टर्स लावू, असा इशाराही त्यांनी दिला.जागतिक परिस्थिती पाहता ठाम आणि धाडसी नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, असेही आवाहन केले.

.“सरकार व पोलीस देशालाच धोक्यात टाकत आहेत का?”
जागतिक परिस्थिती पाहता ठोस नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत मुतालिक म्हणाले, “सरकार व पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतील, तर ते स्वतःलाही आणि देशालाही धोक्यात टाकत आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘केरळा फाईल-2’ हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला संदेश देणारा आहे. त्यामुळे समस्त हिंदू समाजाने हा चित्रपट सहकुटुंब आवर्जून पाहावा असं सांगितले.

‘केरळा फाईल-2’ चित्रपटात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना कसे फसवले जाते, त्यांचे धर्मांतर कसे केले जाते याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या २५ वर्षांपासून श्रीराम सेना लव्ह जिहादविरोधात लढा देत असून दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सुमारे आठ हजार कॉल्स आले होते. त्यापैकी लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या सुमारे ७५ टक्के हिंदू मुलींना आम्ही वाचवून त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले, असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला श्रीराम सेनेचे स्थानिक नेते रवी कोकितकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.