belgaum

मोहित चौहानच्या सुरांनी ‘ऑरा’ फेस्टची रंगतदार सांगता

0
525
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक लॉ सोसायटीच्या जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑरा’ या नॅशनल फेस्टिव्हलच्या सांगता समारंभात प्रख्यात पार्श्वगायक मोहित चौहान यांच्या सुरेल मैफिलीने उपस्थित तरुणाई मंत्रमुग्ध झाली. जीआयटी कॉलेजच्या मैदानावर जमलेल्या विद्यार्थ्यांनी आणि संगीतप्रेमींनी मोहित चौहान यांच्या गाण्यांवर ठेका धरत उत्साहात सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात Jab We Met या चित्रपटातील लोकप्रिय “जो भी मैं” या गीताने झाली. त्यानंतर त्यांनी “ये दूरियां, ये राहों की दूरियां” हे गाणे सादर करत वातावरण अधिक रंगतदार केले. त्यांच्या दमदार आणि सुरेल आवाजामुळे मैदानावर जमलेली तरुणाई अक्षरशः थिरकू लागली.

मैफिलीच्या दरम्यान मोहित चौहान यांनी काही गाणी सादर करताना प्रेक्षकांनाही साथ देत गाण्यास प्रवृत्त केले. तसेच “ब्लास्ट फ्रॉम द पास्ट” या संकल्पनेतून जुन्या चित्रपटांतील गाण्यांचे मुखडे गात उपस्थितांना वेगळाच आनंद दिला.

उत्कृष्ट वाद्यवृंद, दर्जेदार साऊंड सिस्टीम आणि रंगमंचावरील नेत्रदीपक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि रंगतदार वातावरण निर्माण झाले होते.

 belgaum

समारोपाच्या वेळी बोलताना मोहित चौहान म्हणाले, “बेळगावला माझी ही पहिलीच भेट आहे. निसर्गरम्य आणि सुंदर शहर असून येथील प्रेक्षकांचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला.”

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.