belgaum

मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेला मुदतवाढ

0
303
Maratha bank
Maratha bank
 belgaum

बेळगाव लाईव्ह : : बेळगावमधील मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि. ने आपल्या नोकरभरती प्रक्रियेच्या अर्ज सादरीकरणाच्या मुदतीत वाढ केली आहे. कृतिशील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीला मान देऊन बँक प्रशासन आणि जॉईंट रजिस्ट्रार यांनी हा निर्णय घेतला असून, आता उमेदवारांना ६ एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत.

मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने १६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार शाखा व्यवस्थापक (१ पद), अधिकारी (४ पदे), तांत्रिक कर्मचारी (२ पदे), लिपिक (८ पदे) आणि सब स्टाफ (७ पदे) अशा एकूण २२ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले होते. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, महावीर जयंतीनिमित्त राज्य सरकारने ३० मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने अर्जदारांची गैरसोय टाळण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई म्हणाले की, “मराठा समाजाने बहुजन समाजाचा विचार करून ही मुदतवाढ मिळवून दिली, त्याबद्दल आम्ही बँकेचे ऋणी आहोत. जास्तीत जास्त मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि परीक्षा प्रक्रियेत सहभाग नोंदवावा.”

 belgaum

बँकेच्या महाव्यवस्थापकांनी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकानुसार, आता इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बँक कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे दुर्गम भागातील आणि सुट्टीमुळे अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.