belgaum

आगीत घर भस्मसात; कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचा मदतीचा हात

0
414
 belgaum


बेळगाव लाईव्ह :संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारे हात समाजातील माणुसकीचे खरे दर्शन घडवतात. सिंगिनकोप येथे राहणाऱ्या स्वाती संतोष कुंभार यांचे कौलारू घर अलीकडेच लागलेल्या आगीत पूर्णपणे भस्मसात झाले. या दुर्घटनेत घरातील संसार उपयोगी साहित्य, कपडे व आवश्यक वस्तू जळून खाक झाल्याने कुंभार कुटुंबावर मोठे संकट ओढवले.

या कठीण प्रसंगी बेळगाव येथील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट पुढे सरसावला. ट्रस्टतर्फे स्वाती कुंभार यांना आर्थिक मदत तसेच संसारासाठी लागणारे आवश्यक साहित्य देऊन दिलासा देण्यात आला.

 belgaum

शनिवार (दि. 14) रोजी ही मदत स्वाती कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अभय लगडे, रमेश देसुरकर, अविनाश खन्नुकर, प्रसाद बाचोळकर आणि कृष्णा कुंभार उपस्थित होते.

अचानक आलेल्या या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला ट्रस्टच्या या मदतीमुळे नवे धैर्य मिळाले असून समाजातील संवेदनशीलतेचे हे उदाहरण ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.