बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग, बेळगाव येथील कलाश्री उद्योग समूहातर्फे सुरू असलेल्या पाचव्या ग्राहक बक्षीस योजनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून मच्छे येथील जय भारत क्रेडिट सोसायटीमध्ये नव्या सदस्यांना नोंदणी पत्र व कुपन बुक वितरण करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कलाश्री उद्योग समूहाच्या पाचव्या ग्राहक बक्षीस योजनेत 500 रुपये भरून सदस्य नोंदणी होते मुख्य विजेत्याला ट्रॅक्टर व रोग दीड लाख रुपये दुसरे बक्षीस कार व दीड लाख रुपये अशी एकूण 21 आकर्षक बक्षिसे आहेत.
यापैकी शेवटचे 21 वे बक्षीस 5 वर्षे 9 महिन्यांची 50 हजार रुपयांची ठेव पावती कलाश्री क्रेडिट सोसायटीतर्फे देण्यात येणार आहे. नव्या सदस्यांना नोंदणी पत्र व कुपन बुक वितरण करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मच्छे येथील जयभारत को -ऑप. सोसायटीचे चेअरमन व कला श्री योजनेचे डीलर गंगाधर लाड यांच्याकडे कुपन बुक सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील, आशिष कुमार, मालजी पाटील, पारिश कोलकार, सोसायटीचे संचालक ज्योतिबा डुकरे, अशोक लाड, जयपाल चौगुले, शांता डेळेकर, विष्णु सुतार, महादेव करेन्नावर, कलाश्री ग्रुपचे चेअरमन प्रकाश डोळेकर, संचालिका सुकन्या डोळेकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांना नोंदणी पत्राचे वितरण करण्यात आले.





