belgaum

अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न पूर्ण करणार : खासदार जगदीश शेट्टर

0
483
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधून हॉकी खेळात देशाला अनेक ऑलिम्पिकवीर मिळाले आहेत. त्यामुळे शहरात अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्याचे स्वप्न माझ्या कार्यकिर्दीत नक्की पूर्ण करणार, असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले.

हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित ५ व्या आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमणी होते. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

स्पर्धेतील मुलांच्या गटात संगोळी रायण्णा महाविद्यालयाने २-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर आरपीडी महाविद्यालय उपविजेता ठरले. मुलींच्या गटात आरपीडी महाविद्यालयाने १-० ने विजय मिळवत विजेतेपद मिळवले, तर संगोळी रायण्णा महाविद्यालय उपविजेता ठरले.

 belgaum

स्पर्धेत शुभम नाईक (संगोळी रायण्णा) आणि नेत्रा गुरव (आरपीडी) यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तसेच सायली पाटील आणि सावनी गोडबोले यांची उगवते खेळाडू म्हणून निवड झाली.

विजयी संघांना प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक अधिकारी हरिविजय मच्छलवार, तसेच कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय करून देत स्पर्धेची माहिती दिली. विजयी संघांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व. आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ चषके प्रदान करण्यात आले.

यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रकाश चाळके, सुरेश पोटे, दयानंद कारेकर, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे, गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, डॉ. मल्लिकार्जुन थाल्ला, संतोष दरेकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मनकाळे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.