belgaum

नियोजित देखभाल दुरुस्ती लांबणीवर; १५ मार्चला वीजपुरवठा सुरळीत

0
599
Hescom
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील विविध भागात रविवारी (१५ मार्च) होणारा नियोजित वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय हेस्कॉमने रद्द केला आहे. तांत्रिक कारणास्तव हे देखभाल कार्य पुढे ढकलण्यात आले असून वीजपुरवठा सुरळीत राहणार आहे.

बेळगाव येथील ११० केव्ही उद्यमबाग आणि ३३/११ केव्ही आर.एम-१ उपकेंद्राच्या चौथ्या त्रैमासिक देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी १५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता हे काम रद्द करण्यात आले असून, त्या दिवशी वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे हेस्कॉमच्या शहर विभागाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे उद्यमबाग, अनगोळ, मजगाव, आर.पी.डी क्रॉस, खासबाग, टिळकवाडीचा काही भाग आणि औद्योगिक वसाहतीमधील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वीज कपातीच्या सूचनेची नागरिकांनी नोंद घेऊ नये आणि रविवारी वीजपुरवठा नियमित सुरू राहील, याची नोंद घ्यावी, अशी माहिती बेळगाव शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.